Monday, November 15, 2010

कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती

मुंबईत सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान आहे ‘प्रीती आर्ट्‍अस’ नावाच्या या दुकानात सुंदर मूर्ती, चित्र, शोपीस व स्टीलचे फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे की, हे दुकान कधी चालू तर कधी बंद असते. शेजारच्या पानवाला सांगतो, ग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान उघडण्याची वाट पाहत, पण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एक वेगळेच वेड.

मुंबईसारख्या ‘फास्ट लाइफ’ ने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. आपल्या दुकानात बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचे, इस्पितळांचे व पोलीस ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांची माहिती देऊन बोलावून घेतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीही मातीच होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, ‘बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवा’ हे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील गोष्ती चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यात आली, पण सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न तसा साधारणच होता. पण त्यांच्या असाधारण उत्तराने मला थक्क केले, ‘कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती.’ हे ऐकून अंगावर काटा आला, पण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके... सर्व काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कपड्याच्या तुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांना ‘चार मीटर कपडावाला’ असे ओळखले जाते. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन .... कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन करून पुरले जाते व मृत व्यक्तीच्या जातीचा मन ठेवनूच अंत्यसंस्कार केले जातात. ‘रद्गती’ नावाचा त्यांचा एक ट्रस्ट त्यांनी बनवला. ‘डोनेशन घेण्यासाठी हा ट्रस्ट नाही स्थापन केला मी. माझ्यानंतर हे कार्य सुरू राहावे व लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहे’ असे ते सांगतात. दुकानाबाहेर दोन व्हॅन सतत उभ्या असतात. फुकट शव नेण्याची सुविधा हा ट्रस्ट सामान्य माणसांसाठी देतो व मयताचे सारे सामानही फुकट वाटले जाते. सर्व इस्पितळे आता किशोर भट यांना ओळखतात. काही गरीबांकडे उपचारांवर खर्च झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे उरत नाहीत. अशा वेळी किशोरजींचा नंबर दिला जातो. अशीच एक घटना त्यांनी सांगितली. एका बाईची छोटी पोर नायर हॉस्पिटलमध्ये आजाराने मेली. मेलेल्या मुलीला ती सोडून चालली होती. कारण स्मशानाचा व अंत्यसंस्कारांचा खर्च तिला परवडणारा नव्हता. ‘देव नाही!’ असे म्हणून ती रडत रडत बाहेर पडत होती. तेवढ्यात किशोरजी तिथे पोहोचले. तिला थांबवून ते म्हणाले, ‘मी सर्व करीन. मला देवाने पाठवले आहे.’ त्या आईचे काळीज भरून आले असेल आणि कदाचित देवाचीही तीच अवस्था असेल. खंर तर हे कार्य म्हणजे चांगलेपणाचा व देवावरच्या विश्वासाचाच प्रचार आहे, असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत असतात. एकदा तर त्यांच्या दुकानाबाहेर झाडाखाली एक माणूस पडला होता. विचारपूस केल्यावर ‘मला टीबी आहे. दूर जा’, असे तो म्हणाला. किशोरजींनी त्याला टाटा इस्पितळात दाखल केले व त्याचा संपूर्ण खर्च करीत होते. एका आठवड्यात हा माणूस टॅक्सीने दुकानासमोर आला. किशोरजींना टॅक्सीचे पैसे द्यायला सांगितले. ‘मला वेळ नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप केले, धन्यवाद’ असे म्हणून तो कोसळला. फक्त त्यांना भेटण्याकरिता त्या माणसाने श्वास धरून ठेवला होता. माझ्यावर लोक असेच प्रेम करतात, हे सांगून त्यांनी हा किस्सा बंद केला. अनेकांचे आशीर्वाद आणि देवाची कृपा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांच्या दुकानात पाच मिनिटे बसलात तरी प्रसन्न वाटते. लोक मृत्यू, त्रास आणि जनसेवेपासून पळतात हे त्यांना फारसे आवडत नाही.गेल्या वर्षी एका इस्पितळातील सहा एड्सचे रुग्ण मेले. किशोरजींनी शिवडीतील स्मशानात त्यांचे अंत्यसंस्कार केले. तेथील एकाने त्यांना सहानुभूती देण्याकरिता म्हटले, मी मदत करायला येत होतो. आपले संबंधी होते का मृत? किशोरजींनी ‘ ते एड्सचे पेशंट होते’ सांगितल्या क्षणी, ‘बरं झालं, मी नाही आलो’ असे म्हणाला. हे ऐकून किशोरजींना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधी कधी, असे म्हणाला. हे ऐकून किशोरजईंना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधीकधी, असे ते म्हणतात. मुंडके नसलेल्या, किडे पडलेल्या, तुकडे झालेल्या, झडलेल्या, जळालेल्या विचित्र परिस्थितीतल्या शवांना हात लावून, त्यांचे विधी व संस्कार करूनही त्यांना कधी घाण नाही वाटली किंवा कोणता रोग नाही झाला. ते या ढोंगी समाजातील कुचकट भीतीचा व कुटील विचारांचा निषेध करतात. त्यांच्यासाठी सगळे एकच आहे. हल्लीच ताजमधील प्रकरणांत मेलेले १८ शव कस्तुरबा इस्पितळात आणले गेले. किशोरजींना फोन करून बोलावले गेले. ‘सतरांनाच कापड बांधा’ हा आदेश ऐकून त्यांनी ‘का?’ असे विचारले. ‘तो एक आतंकवादी होता. आता तो फक्त एक मृतदेह आहे.’ सर्व इस्पितळांचे व पोलिसांचे लाडके किशोर भट फारच आनंदी व्यक्ती आहेत. ‘सर्व संस्कार केलेले आत्मे माझी काळजी घेतात’ हे त्यांचे म्हणणे आहे. या पिढीला आत्मे आणि संस्कार हे शब्द जरी जरा जड वाटले तरी एक मात्र शिकण्यासारखे आहे, चांगल्यावर विश्वास ठेवा, चांगले करा आणि चांगलेच शोधा, म्हणजे सापडेल. खरं तर हा ‘चार मीटर कपडावाला’ आठवड्याचा माणूस नसून आयुष्याचाच माणूस आहे. दुकानातील शंकराची थ्रीडी मूर्ती आणि किशोरभाईची कीर्ती प्रत्यक्षच पाहायला हवी. जमल्यास नक्की पहा.
किशोर भट २३०८७९७६, २३०९७९७४

Thursday, November 4, 2010

Vastushatra

वास्तुशास्त्राची ओळख

तसा हा विषय आपनास नविन वाटतो पण विषय तसा नवीन नाही; कारण मनुष्य तेवडा विचार करत नाही, त्याच्याकड़े तेवडा वेळ नाही आहे, पण मित्रहो आपण या विषयावर गांभिर्याने विचार केला पाहिजे यावर तुमचा प्रश्न असेल तो म्हणजे का बरे ? मित्रहो तुमचे म्हनने तुमचा प्रश्न बरोबर आहे म्हनुनच आपण या विषयावर येथे माहिती बघणार आहोत,

प्रथम आपणाला या वास्तुशास्त्राची ओळख करुन घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्र म्हणजे नेमक काय असा विचार डोक्यात येतो। मित्रहो, वास्तु याचा अर्थ आहे - निवास करने, वास्तुशास्त्र हे निवास कसा करावा याचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र हे वस्तु पासून बनले आहे पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश या सर्वांचा उपयोग कशाप्रकारे करावा याचे ज्ञान वास्तुशास्त्र करुन देते ।

संक्षिप्तपने बघण्याचे झाले तर वास्तुशास्त्र हे असे ज्ञान आहे जे आपणास घर, बंगला, दुकान, फैक्ट्री यांची रचना कशी करवी की त्यामुळे मनुष्यास स्थैर्य, सुख, शांती, समाधान, यश, धन, ऐश्वर्य मिळावे तसेच त्याला सर्व क्षेत्रात शुभता प्राप्त कीर्ति ।मनुष्य हा यश कीर्ति हे मिळवन्यासाठी प्रयत्न करत असतो पण हे करताना त्याला दुःख, रोग, अशांति विघ्न यानाही तोंड द्यावे लगते हे सर्व करत असताना आपणास या अड़चनी का येतात याचा आपण विचार करतो पण आपणास त्याचे उत्तर मिळत नाही या सर्वाचा विचार आपण येथे करुया त्यासाठी आपण थोड़ी या शास्त्राची अधिक माहिती या ठिकाणी बघूया ।

वास्तुशास्त्र कथा

वास्तुशास्त्रच्या वास्तुपुरुषाच्या तश्या दोन- तिन कथा आहेत त्यातील एक कथा आपण येथे पाहणार आहोत, त्यातील एक - फार प्राचीन काळी अंधकासुर नावाचा महापराक्रमी राक्षस होता । पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव-राक्षस वैर्य मग काय आपल्या परक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अन्धकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शंभु महदेवांकड़े धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासुराला युद्धाचे आवहान केले त्याने आवहान स्वीकारले । श्री शिवशंकर आणि अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला । अंधकासुर मरण पावला । या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या, त्यातील एका घामाच्या थेंबातुन एका करालपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष ।

या करालपुरुषाने तेथेच मरूण पडलेल्या अन्धकासुराच्या प्रेताचा प्रथामतः फडशा पाडला पण त्याची भूख कही केल्या भागेना मग त्याने भगवन श्री शिवशंकरांची आराधना केलि आणि त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील काहीही खावुन टाकन्याची अनुमति मागितली वर मागताच वर देने आशी ख्याति भोलेनाथ श्री शिवशंकर यांची त्यानी त्याला तथास्तु म्हणुन वर दीला । वर मिळाल्यावर त्याने जे कही दीसेल ते खावुन टाकन्यास सुरुवात केली त्याने मन्दिर, डोंगर, घर, वृक्ष, प्रसाद, प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला, त्यामुळे तीन्ही लोकांत हाहाःकार उडाला देव, दानव, मानव सर्वच घाबरले । या करालपुरुषाला कसे आवरयचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता (त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातुन झालेला।) त्याला युद्धात पराजीत करनहि कठिन होते । आता काय करावे सर्वच मोठया पेचात पडले ।

देव-दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले । दोघांनी मिळुन एक युक्ति शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करुन गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबुन धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहिल याची दक्षता घेतली ।

वस्तुपुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रतेक देव-दानव यांनी तो उठू नये म्हणुन त्याला सगळीकडून प्रतेकी एकाने धरून ठेवले । ईशान्य ही दिशा शिवशंकर यांची आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आर्शीवाद घेण्यासाठी तेथे थांबने या गोष्टी ओघाने आल्याच । देव-दानव यांनी श्री शिवशंकर यांची करुना भाकाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केलि । पण त्याल्या शिवशंकर यांनी काहीही काहीही खावुन टाकण्याचा वर दिला होता । मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली । सरतेशेवटी एक तोडगा निघाला । या तोडग्यानुसार पृथ्विवरिल सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणुन खावे तसेच नविन घर बांदल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे । आशा घराचे रक्षण वस्तुपुरुषाने करावे असे ठरले ।

तसेच यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बलि (नैवेज्ञ) हाही तुझाच आहार राहिल तसेच जे वास्तुपुजा करनार नाहीत तेहि तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहिल । आशा प्रकारे त्याला वचन दिले गेले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला । तेव्हापासून वास्तुशांति करण्याची प्रथा प्रचलित झाली । कोणतीही नविन वास्तु बंधल्यावर किंवा वस्तुत कोताही बदल (जीर्णोद्धार) केल्यानंतर वास्तुशांति करणे अनिवार्य आहे । नाहीतर ती वास्तु वस्तुपुरुशाचा आहार बनेल व तेथे स्मशान होइल असा उल्लेख मत्स्यपुराण अध्याय-२५३ मध्ये ओवी नम्बर १७, १८, १९ मध्ये उल्लेखले आहे।

वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणुन त्याला देव-दानव यांनी सगळीकडून चारही बाजूने तसेच त्याच्या अंगावर चढूण धरून ठेवले होते त्याच्या त्या शरीराचा तो तो प्रतेक भाग त्यावर स्थान्पत्र झालेल्या देवतेच्या नावाने ओळखला जावू लागला । सर्व देवतांचा यावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला। त्याला पकडून धरलेल्या एकूण ४५ देवता आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापत्र आहेत त्याची आकृति पुढे आहे । वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर रेखांकित केलेल्या ४५ देवतांच्या या रेखाचित्रास वास्तुपदमंडल असे म्हणतात । याचा उपयोग मनुष्यास राहण्ययोग्य निवास बांधताना होतो । कारण यातील प्रतेक देवतेचे वेगळे एक तत्त्व आहे । त्या तत्वानुसार प्रतेक स्थानाची फलश्रुति प्राप्त होते । बांधकाम करतांन जर यात कही दोष राहिले तर त्या त्या देवतेच्या तत्वाची हनी होते व त्याचा त्रास वास्तु मालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारी व्यक्तिस होतो । म्हणुन वास्तु-निवासचे बांधकाम करताना याची काळजी घ्यावी लागते ।

अष्टदिशा

अष्टदिशा : पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा आहेत.

१. पूर्व दिशा : या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे. त्याची पत्नी शची देवी आहे. त्याचे नगर (पूर) अमरावती आहे. त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (१) , वृषभ (२) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.

२. आग्नेय दिशा : या दिशेचा दिशापालक अग्नी देव आहे. त्याची पत्नी स्वाहा देवी आहे. त्याचे नगर (पूर) तेजोवती आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. त्याचे आयुध भोप (रोज) / राग (क्रोध) हे आहे. या दिशेची राशी मिथुन (3) आहे. या दिशेचा रंग लाल/तांबडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धान्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे.
३. दक्षिण दिशा : या दिशेचा दिशापालक यम देव आहे. त्याची पत्नी शामला देवी आहे. त्याचे नगर (पूर) संयमनी आहे. त्याचे वाहन महिष आहे. त्याचे आयुध कालपाश हे आहे. या दिशेची राशी कर्क (४), सिंह (५) आहे. या दिशेचा रंग लाल आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला आदि लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह मंगळ हा आहे.

४. नैऋत्य दिशा : या दिशेचा दिशापालक नैऋती देव आहे. त्याची पत्नी दीर्घा देवी आहे. त्याचे नगर (पूर) कृष्णांग आहे. त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे. त्याचे आयुध कुंत हे आहे. या दिशेची राशी कन्या (६) आहे. या दिशेचा रंग धूम्र आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धैर्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचे ग्रह राहू-केतू हे आहेत.
 
५. पश्चिम दिशा : या दिशेचा दिशापालक वरुण देव आहे. त्याची पत्नी कालिका आहे. त्याचे नगर (पूर) श्रद्धावती आहे. त्याचे वाहन मगर आहे. त्याचे आयुध पाश हे आहे. या दिशेची राशी तुल (७) व वृश्चिक (८) आहे. या दिशेचा रंग लाल, तांबडा व काळा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला गज लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शनीदेव हा आहे.
 
६. वायव्य दिशा : या दिशेचा दिशापालक वायूदेव आहे. त्याची पत्नी अंजनी देवी आहे. त्याचे नगर (पूर) गंधवती आहे. त्याचे वाहन हरीण आहे. त्याचे आयुध ध्वज हे आहे. या दिशेची राशी धनु (९) आहे. या दिशेचा रंग पांढरा, निळा, काळा, करडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला विजय लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह चंद्र हा आहे.
 
७. उत्तर दिशा : या दिशेचा दिशापालक कुबेर देव आहे. त्याची पत्नी चित्रलेखा देवी आहे. त्याचे नगर (पूर) अलकावती आहे. त्याचे वाहन पांढरा घोडा आहे. त्याचे आयुध खड्ग हे आहे. या दिशेची राशी मकर (१०), कुंभ (११) आहे. या दिशेचा रंग पिवळा, पोपटी, हिरवा, पिवळसरपांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धन लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह बुध हा आहे.
८. ईशान्य दिशा : या दिशेचा दिशापालक देवाधिदेव महादेव आहे. त्याची पत्नी पार्वती देवी आहे. त्याचे नगर (पूर) कैलास (हिमालय) आहे. त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. त्याचे आयुध त्रिशूळ हे आहे. या दिशेची राशी मीन (१२) आहे. या दिशेचा रंग हिरवा, पांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला संतान लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह गुरु हा आहे.  

घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार

सिंहद्वार : घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार. घराचे मुख्य प्रवेशद्वार तसेच कंपाऊंड गेट दोन्हीला सिंहद्वार इतकेच महत्व आहे. घरासाठी चारही दिशांना प्रवेशद्वार करता येते फक्त ते कोठे असावे म्हणजे ते वास्तू एकाशितीपद मंडळाच्या कोणत्या पदात असावे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो ते आपणास खालील आकृती व माहितीवरून स्पष्ट होईल.

   
मयमतम् (अ. ३० ओ. ४४-४६) मध्ये आलेल्या संदर्भनुसार बत्तीस पद वास्तुमंडळात महेंद्र, राक्षस (गृहक्षत, बृहत्क्षत), पुष्पदंत व भल्लाट या चार पदांवरच द्वार असावे कारण हि चारही द्वार त्यांच्या त्यांच्या अधिपती देवतांद्वारे संरक्षित असतात. बुद्धिमान लोकांना याच प्रकारच्या द्वाराची योजना आत अथवा बाहेर करणे शुभ मानले आहे बाकी सर्व द्वार दोषयुक्त मानली आहेत. तसेच ब्रह्म स्थानाच्या मधोमध (आकृतीत तुटक रेषा दाखवली आहे) द्वार दोषयुक्त मानले आहे. थोडक्यात घराचे द्वार इमारतीच्या मध्यरेषेच्या डावीकडे असावे.
 
मत्स्यपुराण मध्ये आलेल्या संदर्भनुसार पूर्वेकडून जयंत व महेंद्र या पदात, बुद्धिमान लोकांसाठी याम्य म्हणजेच यम, वितथ या पदात, पश्चिमेला पुष्पदंत व वरुण या पदात आणि उत्तरेला भल्लाट व सोम या पदात द्वार शुभ मानले आहे.जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 01
वास्तुशास्त्राप्रमाणे भूमीचे म्हणजेच जमिनीचे परीक्षण करणे या गोष्टीला ऋषी-मुनींनी खूप प्राधान्य दिले आहे. जमिनीचे परीक्षण कसे करावे याचे काही मुद्दे :

१. जी जमीन शेतीसाठी उत्तम उपजावू आहे. ज्या जमिनीवर झाडे, फुले, हिरव्या वनस्पती चांगल्या प्रमाणे वाढतात अशी जमीन चांगली समजली जाते. तसेच या जमिनी मध्ये उंदीर, घूस यांची बीळे काटेरी वनस्पती, झाडे असू नयेत अशी जमीन निकृष्ट समजली जाते. तसेच त्या भूमीत शल्य (हाडे) असतील तर अशी भूमीही वाईट समजली जाते. जर जमीन खाली वर असेल तर म्हणजे जमिनीवर योग्य उतार, सापाटपणा नसेल, जमिनीत खाच-खळगे असतील तर अशी जमीन दोषयुक्त मानली जाते. जमीन कशी आहे त्याप्रमाणे त्याचे दुष्परीणाम मिळतात. तसेच त्या जमिनिला कशाप्रकारचा गंध (वास) आहे याचाही विचार केला गेलेला आहे. दुर्गंधी जमीन वाईट समजली जाते.

२. भूमी मध्यात एक हाथ लांब म्हणजे साधारणता दीड फुट लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा त्यास गाईच्या शेणाने सारवावे व त्यामध्ये चार मुख दिशांना म्हणजेच पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांना तुपाचे दिवे लावावे त्यापैकी जर पूर्व दिशेचा दिवा जास्त काळ तेवत राहिला तर अशी भूमी ब्राम्हण वर्णासाठी उत्तम समजली जाते. अशाप्रकारे उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेचे दिवे अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य व शुद्र वर्णासाठी शुभ समजली जाते. तसेच जर चारही दिशेचे दिवे तेवत राहिले तर ती जमीन सर्व वर्णासाठी उत्तम समजली जाते.

३. जमीन नांगराने नांगरून त्यात सर्व प्रकारची बी (मुग, तील, गहू  ईत्यादी) पुरावीत. जर ते बी तीन रात्रीत उगवले म्हणजेच त्याला जर अंकुर फुटले तर ती जमीन उत्तम, पाच रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन मध्यम व सात रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन कनिष्ट समजली जाते अशी जमीन सर्व प्रकारच्या कार्यासाठी वर्ज्य समजली जाते. (संदर्भ मत्स्यपुराण अध्याय २५३) .

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 02
१) गोमुखी प्लॉटस : जर ईशान्य कोपरा व आग्नेय कोपरा ९० अंश पेक्षा कमी असेल व वायव्य व नैऋत्य कोपरा ९० अंश पेक्षा जास्त असेल तर असा प्लॉट गोमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ गोमुखी समजला जातो. कारण याचा परिणाम अशुभ असतो पैसा भरमसाठ मिळतो पण खर्चही तसाच होतो बचत होत नाही.

तसेच जर फक्त ईशान्य कोपरा वाढ असेल तर असाही प्लॉट गोमुखी समजला जातो. याचा परिणाम शुभ असतो पैसा चांगल्या मार्गाने मिळत जातो. पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होईल.

२) व्याघ्रमुखी प्लॉटस : जर ईशान्य कोपरा व आग्नेय कोपरा ९० अंश पेक्षा जास्त असतील व वायव्य व नैऋत्य कोपरा ९० अंश पेक्षा कमी असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो.

वायव्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व ईशान्य कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तर तसेच नैऋत्य व आग्नेय हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा वायव्य कोपरा वाढ असल्यामुळे पैशाचा अपव्यय होतो, शत्रुत्व वाढते, हातून पापकर्मे घडतात अशा प्रकारचे अशुभ परिणाम होतात.

नैऋत्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व आग्नेय कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तसेच वायव्य व ईशान्य हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा नैऋत्य कोपरा वाढ असल्यामुळे हातून पापकर्मे घडतात, कष्ट करूनही पैसा टिकत नाही. तसेच आत्मघाती प्रसंग येतात, अपघात, आत्महत्या अशा प्रकारचे अशुभ प

 

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 03

यल (L) आकाराचे प्लॉट्स : आपण प्लॉट खरेदी करताना तो कसा पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण काही प्लॉट्स (L) यल आकाराचे असतात. असे प्लॉट आपली वास्तू बांधण्यासाठी अयोग्य असतात. असे यल आकाराचे प्लॉट आपल्याला त्याचा कोणता कोपरा कट आहे त्या प्रमाणे अशुभ फळे देतात. यल (L) आकाराच्या प्लॉट मध्ये कोणता कोपरा कट असल्यावर त्याचे अशुभ परिणाम कोणते मिळतात ते आपण पुढील प्रमाणे पाहूया.

(अ) ईशान्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट :
अनेक प्रकारच्या संकटाना तोंड द्यावे लागते, संतती मध्ये पुरुष संतती कमी व स्त्री संतती जास्त तसेच वास्तू मालकास मानसिक स्वास्थ्य मिळत नाही, आर्थिक संकटे येतात, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.

(ब) आग्नेय कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : आशा प्रकारच्या प्लॉट चे परिणाम जास्त करून वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या स्त्रियांना होतात, आर्थिक संकटे येतात, मानसिक स्वास्थ्य बिघडते तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.
 

(क) नैऋत्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट :
अपघात, आर्थिक संकटे, मानसिक स्वास्थ्य, आजारपण आशा प्रकारच्या परिणामांना तोंड द्यावे लागते.
 

(ड) वायव्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : पैशाचा अकारण खर्च वाढतो, पैसा येतो तसा खर्चही होतो. मुलींच्या लग्न कार्यात अडथळे, शत्रुत्व निर्माण करतो, तसेच चोरीचे भय वाढते.
 


वस्तूच्या दिशा व पंचतत्वे

वास्तूमध्ये वास्तूचे लांबी व रुंदी प्रमाणे माधोमद उभी व आडवी रेषा मारल्यावर चार खंड तयार होतात. त्या खंडामध्ये अनुक्रमे ईशान्य दिशेकडे म्हणजेच ईशान्य खंडामध्ये जल तत्व, आग्नेय दिशेमध्ये म्हणजेच आग्नेय खंडामध्ये अग्नी तत्व आसते, नैऋत्य खंडामध्ये पृथ्वी तत्व व वायव्य खंडामध्ये वायू तत्व आसते. तसेच वास्तूचे लांबी व रुंदी प्रमाणे समान तीन उभ्या व आडव्या रेषा मारल्यावर एकूण समान ९ भाग होतात त्यातील मधील भाग हे वस्तूचे ब्रम्ह स्थान असते त्यामध्ये वास्तूचे ब्रम्ह म्हणजेच आकाश तत्व असते.

पुढील आकृतीवरून हि संकल्पना अधिक स्पष्ट होईल :

 

वास्तुपुरुष आणि त्याची मर्मस्थाने

वास्तुपुरुष आणि त्याची मर्मस्थाने या विषयाकडे आपण गांभीर्याने पहिले पाहिजे कारण वास्तू बांधण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण पहिल्या पाहिजेत वास्तू बांधण्याचा आराखडा म्हणजे प्लँन करताना वास्तुपुरुष्याच्या मर्मस्थानांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण जर सांगायचे झाले तर मानवाच्या शरीरात जसे अक्कुप्रेशर बिंदू असतात व त्या त्या बिंदूवर आपण कमी अथवा जास्त असा दाब दिल्यावर शरीरातील ज्या त्या ठिकाणच्या वेदना कमी अथवा जास्त होतात त्या प्रमाणेच वस्तूतही वास्तुपुरुषाची षण्महन्ति, महामर्म तसेच उपमर्म असे विविध बिंदू असतात. वास्तू बांधताना वास्तुपुरुषाच्या या मर्मस्थानावर / बिंदूवर कोणतेही बांधकाम म्हणजेच या बिंदूवर खांब, तुळई, भिंत, खिडकी, दार तसेच इतर कोणतेही बांधकाम येणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. वास्तुशास्त्र मध्ये सर्वात जास्त महत्त्व या गोष्टीकडे दिले गेले आहे. आपण वास्तुपुरुष एकाशितीपद मंडल हा विषय पहिला आहे त्या पदमंडळात आपण ज्या दक्षिणोत्तर व पुर्वपश्चिम ज्या उभ्या व आडव्या रेषा पहिल्या त्यांना वस्तूच्या शिरा म्हणजेच नाड्या आसे म्हणतात.

समरांगण सूत्रधार याच्या आध्याय क्रमांक १२, १३ मध्ये पुढील माहिती दिली आहे :

वास्तुपुरुषाच्या डोक्यात, मुखात, हृदयात, बेंबीत (नाभीत) तसेच वास्तुपुरुषाच्या दोन्ही स्तनावर जे बिंदू दर्शिवले आहेत त्यांना वास्तुपुरुषाचे षण्महान्ति बिंदू म्हणतात, वंश रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्या ठिकाणावरील बिंदुना महामार्मास्थान म्हणतात. तसेच उभ्या व आडव्या रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्या ठिकाणावरील बिंदुना उपमर्म स्थान असे म्हणतात.

या मर्म स्थानावर जर कोणतेही बांधकाम, खांब, खिडकी, दार, भिंत आली तर वास्तुपुरुषाच्या ज्या ज्या बिंदुना बाधा होईल त्या त्या ठिकाणी वास्तुमालकास तसेच त्या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या वाक्तीस पिडा होते. म्हणून वस्तू बंध्तन या मर्म स्थानावर कोणतेही बांधकाम येणार नाही याची काळजी घ्यावी. थोडक्यात, वास्तू बांधण्याचा प्लान करताना या मर्मस्थानांचा खूप गाम्भिर्याने विचार करावा.

पुढील आकृतीवरून आपल्याला अधिकच स्पष्ट होईल :वास्तु एकाशितिपद मंडल

वास्तु एकाशितिपद मंडल याचा उपयोग मनुष्यालय, चार वर्नातिल लोकांची निवास्स्थाने तसेच राजप्रसाद यांची रचना करण्यासाठी वस्तुशिल्पि म्हणजेच वास्तु स्थापति याने उपयोग करावा भवन निर्माण करताना तसेच भवनातिल विविध प्रभागासाठी याचा उपयोग होतो

वस्तुशास्त्रत कोणते कार्य कोणत्या देवतेच्या पदावर करावे याबद्दल खुप सुक्ष्म विचार केला गेला आहे तय प्रमाने जर वास्तु निर्माण झाले तर सुख, ऐश्वर्य, कल्याण, संपत्ति, संतति, आयुष्य याची प्राप्ति होते

वस्तुपदमंडलाच्या बाहेर ईशान्य कोनापासुन अनुक्रमे चरकी, स्कन्द, विदारी, अर्यमा (विकट), पूतना, जम्भं, पाप्रराक्षसी (पाप) पिलिपिच्छ हे बालग्रह येतात यांना मुख्या दिशा यांचे रक्षण करणारे दिक्पाल आशी संज्ञा दिली आहे त्या त्या प्रमाने त्या त्या दिशेवर त्यांचे प्रभुत्व आसते

पूर्व दिशेवर इन्द्र, आग्नेयावर अग्नि, दक्षिण वर यम्, नैऋत्य वर नैऋत्ती, पच्छिम दिशेवर वरुण, वायव्य दिशेवर वायु, उत्तरेवर सोम-कूबेर ईशान्य वर इशान हे दिकपाल आहेत


वास्तुपुरुषाच्या अंगावरील ४५ देवता

मयमतम (अ ), मत्स्यपुराण (अ २५३), समरंगाव सूत्रधार (अ १२) , अपराजितपृक्छा (अ ५६) इत्यादि ग्रन्थ संदर्भा नुसार वास्तुपुरुष्याच्या अंगावर स्थानापन्न आसलेल्या देवता पुढिलप्रमाणे आहेत :-

वास्तुपुरुष्याच्या डोक्याच्यावर म्हणजे शीर्ष या स्थानी शिखी ही देवता आहे, मुखावर आप ही देवता, छातीवर अपवस्त ही देवता येते । डाव्या स्तनावर पृथ्विधर ही देवता व उजव्या स्तनावर अर्यमा ही देवता येते । त्याच्या डाव्या नेत्रावर दिति व उजव्या नेत्रावर पर्जन्य ही देवता आहे, डाव्या कानावर आदिती व उजव्या कानावर जयंत ही देवता आहे, डाव्या खांद्यावर ऋषी (सर्प) व उजव्या खांद्यावर इन्द्र ही देवता आहे, डाव्या भुजेवर सोम (चंद्र), भल्लाट, मुख्य, नाग या देवता व उजव्या भुजेवर सूर्य, सत्य, भृष, अंतरिक्ष या देवता । डावा कोपर व गुडगा यावर रोग ही देवता येते । डावी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळ्वे यावर रुद्र व रुद्रजय येतात । उजवा कोपर व गुडगा यावर अनिल ही देवता येते । उजवी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळवे यावर सवित्र, सविता या देवता येतात । डावीकडील जांघेवर पापयक्ष्मा, शोष, असुर, वरुण, पुष्पदंत, सुग्रीव, दैवारिक या देवता आहेत । उजवीकडील जांघेवर पूषा, वितथ, ब्रृहत्क्षत, यम, गन्धर्व, भृंगराज, मृग या देवता आहेत । लिंगावर इन्द्र व इन्द्रजय या देवता आहेत । दोन्ही पायावर पितृ ही देवता आहे । पोट मित्र व विवस्वान यावर आहे । हृदयावर ब्रम्हा ही देवता आहे । मित्र व विवस्वान यावर पोट, जांघ आणि मंड्या यांचा भाग येतो तसेच आर्यामा व पृथ्वीधर या स्थानी हातांच्या तळव्यानजीकचा भाग येतो ।
 
    

वास्तु एकाशितिपद मंडल

वास्तु एकाशितिपद मंडल याचा उपयोग मनुष्यालय, चार वर्नातिल लोकांची निवास्स्थाने तसेच राजप्रसाद यांची रचना करण्यासाठी वस्तुशिल्पि म्हणजेच वास्तु स्थापति याने उपयोग करावा भवन निर्माण करताना तसेच भवनातिल विविध प्रभागासाठी याचा उपयोग होतो

वस्तुशास्त्रत कोणते कार्य कोणत्या देवतेच्या पदावर करावे याबद्दल खुप सुक्ष्म विचार केला गेला आहे तय प्रमाने जर वास्तु निर्माण झाले तर सुख, ऐश्वर्य, कल्याण, संपत्ति, संतति, आयुष्य याची प्राप्ति होते

वस्तुपदमंडलाच्या बाहेर ईशान्य कोनापासुन अनुक्रमे चरकी, स्कन्द, विदारी, अर्यमा (विकट), पूतना, जम्भं, पाप्रराक्षसी (पाप) पिलिपिच्छ हे बालग्रह येतात यांना मुख्या दिशा यांचे रक्षण करणारे दिक्पाल आशी संज्ञा दिली आहे त्या त्या प्रमाने त्या त्या दिशेवर त्यांचे प्रभुत्व आसते

पूर्व दिशेवर इन्द्र, आग्नेयावर अग्नि, दक्षिण वर यम्, नैऋत्य वर नैऋत्ती, पच्छिम दिशेवर वरुण, वायव्य दिशेवर वायु, उत्तरेवर सोम-कूबेर ईशान्य वर इशान हे दिकपाल आहेत