Thursday, April 21, 2011

२००८-०९ अमेरिकन अर्थ व्यवस्था का कोसळली - एक विश्लेषण



‘सब प्राईम (sub prime) कर्जे   - म्हणजे घरातले दागिने शेजारच्या  घरात सुरक्षित ठेवायला देणे 

आपल्या रोजच्या जगण्यातही आपण या संकल्पनेचा वापर करत असतो. सिग्नल तोडल्यावर अपघात होण्याची वा वाहतूक पोलिसाने पकडण्याचा धोका असतो. आपण हा धोका पोलिसावर टाकतो आणि त्याला त्याची फी देतो. नियमानुसार जेथे आपण एका तासात पोहचतो तेथे सिग्नल तोडून आपण अध्र्या तासात पोहचतो. म्हणजे जो अर्धा तास आपण हा धोका दुसऱ्यावर सोपवून वाचवतो, तो झाला ‘कॅन्डी फ्लॉस टाईम.’ प्रत्यक्षात पोलिसाला पसे देऊनही धोका आपल्यापासून दूर जात नाही. दोन चार वर्षांत एखादा अपघात होतो. 

अर्थक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा डोलारा असाच कोसळतो. अपघातानंतर काही काळ आपण नियमानुसार गाडी चालवतो. कालांतराने पुन्हा या धोक्याचे क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करतो. 

जेथे माणसे राहतात तेथे चोऱ्या होणारच हे आपणा सर्वानाच माहित आहे. तरीही शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी हया चोरीच्या धोक्याची डेरिव्हेटिव्ह करून ती ईश्वरावर सोपवलेली असते. त्याने या घरांचे रक्षण करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे येथे एकदोन चोऱ्या झाल्या तरी त्याची बातमी होते. लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपला धोका आपणच स्विकारायचा असतो. तो जितका आपण दुसऱ्यावर सोपवतो तितके आपण समाजाला धोक्यात टाकतो. 
अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स या गुंतवणूक क्षेत्रातील महाकाय बँकेने १५ सप्टेंबर २००८ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. या बँकेची एकूण मालमत्ता ६०,००० कोटी डॉलर्सच्याही वर होती. अमेरिकेच्या वित्तीय क्षेत्रात झालेली उलथापालथ लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर जगाच्या दृष्टीस आली.
ही बँक लयाला जाण्याआधी काही महिने एक नवा शब्द अर्थक्षेत्रात चच्रेला आला होता, तो म्हणजे ‘सब प्राईम (sub prime). जी व्यक्ती कर्ज देण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अटी पूर्ण करू शकत नाही आणि तरीही पात्रता नसताना तिला कर्ज दिले जाते अशा कर्जाला सबप्राईम म्हणजे प्राईम लोन पेक्षाही कमी दर्जाचे कर्ज, अशी या शब्दाची सोपी व्याख्या आहे.
सर्वच क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्राची माहिती अत्यंत अलाकलनीय पध्दतीने सांगण्याची खूबी अवगत असते. आपले काम आपण जितके कठीण करून लोकांना सांगतो तितके त्याच्या नजरेत आपले महत्त्व वाढते. कोणतीही गोष्ट सोपी करून सांगितली की, आपला तिच्यावर विश्वास बसत नाही. अर्थक्षेत्रही याला अपवाद नाही.

कितीही गुंतागुंतीच्या अर्थ संकल्पना वापरल्या तरीही सर्व आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी ‘विश्वास’ असतो. हा विश्वास उडाला की बाकी गणिताला काही अर्थ उरत नाही. सब प्राईम कर्जे देतांना अमेरिकेतील बँकर्सना त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची कल्पना होती. मात्र हे परिणाम त्यांच्या अर्थ व्यवस्थेवर कोणत्या थरापर्यंत आणि किती दूरगामी होतील याचा त्यांना अंदाज आला नाही. साधारणत २००० सालापासून अमेरिकेतील घरांच्या किमती वाढू लागल्या. पशाची मुबलक उपलब्धता, कमी व्याजदर यांमुळे अधिकाधिक लोक घरांमध्ये गुंतवणूक करू लागले. हयातली जवळजवळ ४० टक्के गुंतवणूक ही घरे विकून नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली होती. २००६ सालापर्यंत घरांच्या किंमती जवळजवळ दुप्पट झाल्या. आपल्याकडे कर्ज देताना माणसाची मिळकत, सर्व खर्च वजा जाता कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असणारा पसा यांचा विचार केला जातो. अमेरिकेतील तारणाच्या किंमतीवर कर्जाची रक्कम ठरविली जाते. त्यामुळे घराचा उपयोग लोक एटीएम् सारखा करू लागले. पसा साठविण्यापेक्षाही कर्ज काढून तो उधळण्याकडे लोकांचा कल वाढू लागला. त्यामुळे याच घरावर पुढील वर्षी अधिक कर्ज घेऊन आधीचे कर्ज फेडता येईल असा या नव्या कर्जदारांचा विचार होता. बँकांच्याही बाबतीत ठेवून घेतलेल्या तारणाची किंमत वाढत असल्याने कर्जाने दिलेला पसा सुरक्षित आहे अशी त्यांची समजूत होती.
लोकांना कर्ज घेणे सुलभ आणि आकर्षक वाटावे यासाठी बँकांनी नव्या कर्ज योजना काढल्या. एका योजनेत कर्जदारांनी फक्त व्याजाचेच हप्ते भरायचे होते. दुसऱ्या एका योजनेत हे व्याजाचे हप्तेही त्यांना परवडतील एवढेच त्यांनी भरायचे उरलेले व्याज मुद्दलात जमा होणार होते. उत्पन्नाचा दाखलाही नाही आणि योग्य तारणही नाही अशा स्वरूपाची ही कर्जे होती. त्यांना ठ्रल्लं म्हणजे ‘नो इन्कम नो अ‍ॅसेट’ कर्ज म्हटले जायचे.

आपल्या क्रेडिट कार्ड वर जर थकबाकी असेल आणि आपले कार्ड बंद झाले असेल तर आमच्याकडे या आम्ही कर्ज देऊ, अशा प्रकारच्या जाहिराती अमेरिकन वृत्तपत्रांतून येत होत्या. काही बँका तर केवळ सब प्राईम कर्जदारांनाच कर्ज देत होत्या. सर्वसाधारणपणे व्याजाचा दर हा बँक कर्ज देतांना परतफेडीबाबत कोणता धोका पत्करते हयावर अवलंबून असतो. त्यामुळे सबप्राईम कर्जदारांबाबत हा दर नेहमीच अधिक असतो. मात्र याच काळात अमेरिकेतील बँकांकडे उपलब्ध असणारा पसा इतका मुबलक होता की या सबप्राईम कर्जदारांनाही कमी दरातच कर्ज उपलब्ध होत होते.

आपण देत असलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबतचा धोका बँकांच्या ध्यानातच आला नाही हे शक्य नाही. परंतू हा धोका टाळण्यासाठी त्यांनी वेगळया प्रकारची व्यवस्था केली होती. ती म्हणजे क्रेडिट डेरिव्हेटिव्हज् निर्माण करून. ही अर्थ क्षेत्रातील ऐकायला नवी परंतू जूनी संकल्पना. बँका जे कर्ज देतात त्यांची नोंद त्यांच्या ताळेबंदात केलेली असते. हे कर्ज जितके धोकादायक असते त्या प्रमाणात त्यांना मुद्दल बाजूला काढून ठेवणे आवश्यक असते. कर्ज वाटप वाढल्या शिवाय बँकांची मिळकत वाढत नाही. नव्याने कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सतत पसा उभारण्याची गरज असते. हे साध्य करण्यासाठी बँका क्रेडिट डेरिव्हेटिव्हज् निर्माण करतात. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्चा करार होतो त्यावेळी पहिली व्यक्ती दुसरीला आपण दिलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या धोक्याची जबाबदारी घ्यायला सांगते. ही जबाबदारी स्विकारण्यासाठी काही रक्कम फी म्हणून दिली जाते. यात पहिल्या व्यक्तीचा फायदा असा की ती परत नव्याने कर्ज घ्यायला आणि धोका पत्करायला मोकळी होते आणि दुसऱ्या व्यक्तीला धोका पत्करायचे पसे मिळतात. तुमच्या घरातले दागिने तुम्ही शेजारच्या घरात ठेवायला दिलात आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी शेजाऱ्याला पेसे देता. हा शेजारी आणखी १०० लोकांकडून दागिने गोळा करून ते सुरक्षित ठेवण्याचे पसे घेतो. या सगळया दागिन्यांचे समान वाटे करून ते सुरक्षित ठेवण्यासाठी तिसऱ्या माणसाकडे ठेवायला देतो आणि  सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला फी देतो.

प्रत्येक वेळेला माणूस आपला धोका दुसऱ्याच्या डोक्यावर चढवतो. ज्याला आपण धोका पत्करायला सांगितला आहे त्याचे घर किती सुरक्षित आहे याचा आपण विचारच करत नाही. त्याचेही लक्ष आपली फी कशी वाढेल  यावरच असते. मात्र मुळात हा धोका तुमच्यापासून कधीच नष्ट होत नाही. अमेरिकेतील बँकांनी या सबप्राईम कर्जाचे लहान लहान भाग करून अमेरिकेतील आणि अमेरिकेबाहेरील बँकांना विकले. कर्जफेड न होण्याचा धोका तुम्ही जितक्या दूरवर पसरविता तेवढा हा धोका कमी होतो अशी यामागची संकल्पना होती. प्रत्यक्षात मात्र या सबप्राईम कर्जाच्या डेरिव्हेटिव्हज्मुळे इतर देशांतील बँकाही संकटात सापडल्या. अर्थक्षेत्रातील जागतिकीकरणाचा हा परिणाम आहे.

भारतात मात्र याच्या उलटी परिस्थिती आहे. आपल्याकडे रिझर्व बँकेने या डेरिव्हेटिव्हज्बाबत अगदी कडक धोरण स्वीकारले गेले आहे. भारतातील बँकांना या क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगीही नव्हती. त्यामुळे या सबप्राईम घोटाळयाचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही.
मात्र या सबप्राईम कर्ज व्यवस्थेमुळे अमेरिकेतील प्रत्येक माणसाकडे त्याचे घर झाले. त्यांना या घराचे कर्ज फेडणे अशक्य झाल्याने त्यांची अर्थव्यवस्था संकटात सापडली. आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, परंतु आपल्याकडे सर्वसामान्य माणसाला घर घेणे परवडत नाही. अमेरिकेतील बँकांनी त्यांच्या नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न जगातील इतर देशांच्या बँकांवर टाकले. प्रगत अर्थव्यवस्थेचा हा फायदा आहे.

कोणत्या प्रमाणात ही कर्जे दिली गेली? २००६ साली सेरीन नावाच्या एका २४ वर्षीय वेब-डिझायनरने पाच महिन्यांत एकूण सात घरांची खरेदी केली. यासाठी बँकांकडून त्याला एकूण १२० कोटी रूपयांचे कर्ज मिळाले. त्याने मिळकतीचा दाखला खोटा दिला. त्याच्या बँकेमध्ये काही ठेवीही नव्हत्या. आपल्याकडे ३०-४० वर्षे नोकरी करणाऱ्या व्यक्तीलाही ६०-७० लाख रूपयांपलिकडे कर्ज मिळत नाही. यावरून अमेरिकेत सबप्राईम कर्जे कोणत्या थरापर्यंत गेली होती याची कल्पना येईल.
२००७ साली सेरीनची तीन घरे जप्त झाली आणि उरलेल्या चार घरांवरही बँकेने जप्तीची प्रक्रिया सुरू केली. सेरीनने www.Iamfacingforeclosure.com अशा नावाची वेबसाइट सुरू केली. अमेरिकेत सबप्राईम कर्जे कोणत्या स्वरूपात दिली गेली याचे स्वरूप या वेबसाईटवरून समजते.

२००० ते २००६ या काळात अमेरिकेतील घरांच्या किंमती दुप्पट झाल्या आणि या किंमती कमी व्हायला लागल्याबरोबर कर्जफेडीच्या प्रश्नांमुळे बँका संकटात आल्या. आपल्याकडे २००५ ते २०१० पर्यंत घरांच्या किंमती दुपटी तिपटीने वाढल्या आहेत. यातली ४०-५० टक्के गुंतवणूकदारांनी आपले पसे दुप्पट व्हावे हया अपेक्षेने केली आहे. ज्या अर्थव्यवस्थेत घरांचा उपयोग राहण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी होतो ती अर्थव्यवस्था कधीतरी संकटात येतेच. प्रगत देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांत या क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्नी सातत्याने प्रश्न निर्माण केले आहेत. आपण जत्रेत कॅन्डी फ्लॉस खातो. त्याला आपण बुढ्ढी के बाल म्हणतो. चिमूटभर साखरेतून कॅन्डी फ्लॉस तयार करतात. क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्ना कँडी फ्लॉस मनी म्हणतात. वित्तीय संस्था आपण दिलेल्या कर्जाचा धोका इतर संस्थांना विकतात त्यामुळे पसा मोठा होतो. त्या पुन्हा नव्याने कर्जवाटप करायला मोकळया होतात. आपल्या रोजच्या जगण्यातही आपण या संकल्पनेचा वापर करत असतो. सिग्नल तोडल्यावर अपघात होण्याची वा वाहतूक पोलिसाने पकडण्याचा धोका असतो. आपण हा धोका पोलिसावर टाकतो आणि त्याला त्याची फी देतो. नियमानुसार जेथे आपण एका तासात पोहचतो तेथे सिग्नल तोडून आपण अध्र्या तासात पोहचतो. म्हणजे जो अर्धा तास आपण हा धोका दुसऱ्यावर सोपवून वाचवतो, तो झाला ‘कॅन्डी फ्लॉस टाईम.’ प्रत्यक्षात पोलिसाला पसे देऊनही धोका आपल्यापासून दूर जात नाही. दोन चार वर्षांत एखादा अपघात होतो. अर्थक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा डोलारा असाच कोसळतो. अपघातानंतर काही काळ आपण नियमानुसार गाडी चालवतो. कालांतराने पुन्हा या धोक्याचे क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करतो. मग बँकर्सनाच दोष देण्यात काय अर्थ आहे?

जेथे माणसे राहतात तेथे चोऱ्या होणारच हे आपणा सर्वानाच माहित आहे. तरीही शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी हया चोरीच्या धोक्याची डेरिव्हेटिव्ह करून ती ईश्वरावर सोपवलेली असते. त्याने या घरांचे रक्षण करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे येथे एकदोन चोऱ्या झाल्या तरी त्याची बातमी होते. लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपला धोका आपणच स्विकारायचा असतो. तो जितका आपण दुसऱ्यावर सोपवतो तितके आपण समाजाला धोक्यात टाकतो.

Thanks to लोकसत्ता Link to original article

Monday, April 18, 2011

महासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायदा राबवणाऱ्या. नियमापुढे सर्वानाच समान वागवणाऱ्या..

एन्रॉनचे सर्वेसर्वा, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांचा उजवा हात गणले जाणारे केनेथ ले यांना अशाच एका छोटय़ा न्यायालयानं एन्रॉन आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी १६५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ही घटना अगदी अलिकडची. २००६ सालची. अमेरिकेचा हा महाउद्योगपती ५ जुलैला तुरुंगातच मरण पावला.
महासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायदा राबवणाऱ्या. नियमापुढे सर्वानाच समान वागवणाऱ्या..



 
देशातल्याच असं नाही तर जगातल्याही औद्योगिक, आर्थिक विश्वात रजत गुप्ता हे नाव प्रात:स्मरणीय मानलं जातं. व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणारे कानाच्या पाळीला हात लावतात त्यांचं नाव घेण्याआधी..... 
अमेरिकेतल्या मॅकेन्झी या बलाढय़ सल्लागार कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. या नात्याने अनेक बडय़ाबडय़ा कंपन्या, वित्तसंस्था आदींच्या सल्लागार मंडळांवर, सल्लागार पदांवर त्यांना काम करायची संधी मिळाली. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत त्यांचा सत्कार झाला होता, तर अध्यक्षपदी होते जॉर्ज बुश, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष. आपल्या भाषणात त्यांनी रजत गुप्ता यांची तोंडभरून स्तुती तर केलीच, पण त्यांची व्यावसायिक निष्ठा, कर्तव्यपरायणता, सचोटी वगैरे गुण तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतील.. असंही भाकीत वर्तवलं.
आजच अमेरिकेच्या मुख्य न्यायालयात रजत गुप्ता यांच्या विरोधातल्या खटल्याला सुरुवात झाली.
भांडवली बाजाराच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे सेबी आहे. अमेरिकेतला अशा यंत्रणेचं नाव आहे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन- म्हणजे एसईसी. आपल्या सेबीचं नाव तिच्या प्रमुखपदी कोण आहे, यावरून कशा स्वरूपात येणार ते ठरतं. म्हणजे टी.एन. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त होर्ईपयत आपल्याला निवडणूक आयोग नक्की काय काम करतो आणि त्याला काय अधिकार असतात, याची माहिती नव्हती. तसंच आपल्या सेबीचंही. डी.आर. मेहता, ज्यांनी कागदी शेअर प्रमाणपत्रांचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीत करण्याला म्हणजे डीमॅट पद्धतीला गती दिली किंवा आपले चंद्रशेखर भावे वगैरे माणसं सेबीच्या प्रमुखपदावर असली, तर आपल्याला या यंत्रणेचं अस्तित्व जाणवतं. एरवी आपल्याकडे राज्य असतं ते खाविंदांच्या चरणी मिलिंदायमान होणाऱ्या मंडळींचंच.
अमेरिकेचं तसं नाही. एका व्यवसायातून येणारी आर्थिक ताकद दुसऱ्या व्यवसायात वापरणं गैर आहे याची जाणीव तिथल्या जॉन शेरमन नावाच्या लोकप्रतिनिधीला १८९० सालीच होते आणि तसं करणाऱ्यांना रोखण्यासाठी तो कायदाही आणतो. शेरमन अँटी ट्रस्ट नावानं. १९१० साली जन्माला आलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या कायद्याचा पहिला बडगा उगारला गेला तो रॉकफेलर यांच्या साम्राज्याचे तुकडे करण्यासाठी. नंतर एटीअँडटी, मायक्रोसॉफ्ट वगैरे अजस्र कंपन्यांनाही या कायद्यानं सरकारपुढे नाक घासायला लावलं आणि आपल्याकडे काही औद्योगिक घराण्यांच्या र्सवकष नफेखोरीला आणि मक्तेदारीला आळा घालू शकेल असा कायदा आणायची फक्त चर्चाच सुरू आहे. तो प्रत्यक्षात येईपर्यंत मूठभरांच्या हाती आपली अर्थव्यवस्था गेलेली असेल. तर सांगायचा मुद्दा हा की, या रजत गुप्ता यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप आहे. प्रगत म्हणता येईल अशा कोणत्याही आर्थिक विश्वात इनसायडर ट्रेडिंग हा अतिगंभीर गुन्हा मानला जातो. म्हणजे एखाद्याला त्याच्या पदामुळे मिळणारी माहिती त्याने स्वत: अथवा दुसऱ्याला देऊन त्यातून नफा कमावणे. उदाहरणार्थ, समजा कंपनीच्या संचालक मंडळावर असलेल्या एखाद्याला लक्षात येऊ शकतं की लवकरच आपल्या कंपनीचा बोऱ्या वाजणार आहे किंवा लवकरच आपली कंपनी दुसरी एक छोटी कंपनी विकत घेणार आहे किंवा आपल्या कंपनीत कोणी प्रचंड मोठी गुंतवणूक करणार आहे किंवा असंच काही. तर ही माहिती अर्थातच जनसामान्यांना आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांना नसते. अशा वेळी संचालक मंडळातल्या एखाद्याने या माहितीचा गैरवापर केला, म्हणजे आपल्याकडचे कंपनीचे समभाग विकून पैसे कमावले किंवा आपली कंपनी ज्या छोटय़ा कंपनीला विकत घेणार आहे त्या कंपनीचे समभाग घेऊन ठेवले किंवा मोठय़ा गुंतवणुकीच्या माहितीने आपल्याच कंपनीचे समभाग मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून ठेवले, तर या सगळय़ाला म्हणतात इनसायडर ट्रेडिंग. आणि आपल्याकडे  हा प्रकार इतका सर्रास सुरू असतो की त्याचं काही आपल्याला वाटेनासंच झालंय. विषारी दारूने मरणाऱ्यांच्या बातम्या जेवढय़ा आपण थंडपणे बघतो तेवढय़ाच कोरडेपणानं आपण इनसायडर ट्रेडिंग या आधुनिक काळाच्या गंभीर गुन्हय़ाकडे बघत असतो. सेबीचे माजी अध्यक्ष भावे यांनी काही आपल्याकडच्या बडय़ा कंपन्यांवर इनसायडर ट्रेडिंगचे खटले भरेपर्यंत असं काही व्हायला हवं, अशी जाणीवच नव्हती आपल्याला. पण अमेरिकेत सुदैवाने अर्थातच असं नाही. त्यामुळे रजत गुप्ता यांच्या विरोधात भरभक्कम आरोपपत्र सरकारनं तयार केलंय. वरकरणी पाहता आपल्याला किंवा आपल्या ‘चलता है’ नजरेला किंवा तळे राखील तो पाणी चाखणारच या निर्लज्ज दृष्टिकोनाला गुप्ता यांनी काही पाप केलंय असं वाटणारही नाही.
तर झालं काय की रजत गुप्ता हे गोल्डमन सॅक या जगातल्या सर्वात बडय़ा बँकेच्या आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीच्या संचालक मंडळावर होते. याच काळात त्यांची दोस्ती होती राज राजरत्नम या गुंतवणूदार कंपनी चालवणाऱ्याशी. गॅलिऑन मॅनेजमेंट नावाची कंपनी तो चालवतो. नावावरनं वाटतो तो भारतीय, पण आहे श्रीलंकन.
तर २००८ साली २२ सप्टेंबरला प्रसिद्ध गुंतवणूक गुरू, अब्जाधीश वगैरे असे वॉरन बफे यांनी गोल्डमॅन सॅकमध्ये तब्बल ५०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाचे सदस्य या नात्याने गुप्ता यांना ही माहिती इतरांच्या आधी कळली. लागलीच त्यांनी राजरत्नम याला फोन केला आणि ही माहिती दिली. त्यानं अजिबात वेळ दवडला नाही आणि शेअर बाजार बंद व्हायला पाचेक मिनिटं असताना गोल्डमनचे एक लाख ७५ हजार समभाग विकत घेतले. दुसऱ्याच दिवशी २३ सप्टेंबरला बफे यांच्या गुंतवणुकीची अधिकृत घोषणा झाली. गोल्डमनच्या समभागांचा भाव काहीच्या काही वाढला. राजरत्नम याने आपल्याकडचे समभाग लगेच विकले. या एकाच व्यवहारात त्याला नऊ लाख डॉलर्सचा, साधारण चार कोटी ५० लाख रुपयांचा फायदा झाला.
त्याच्या आधी १० जूनला असाच एक प्रकार घडला. गोल्डमनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी लॉइड ब्लँकफेन यांचा गुप्ता यांना त्या दिवशी रात्री उशिरा फोन आला. त्या काळात एकंदरच जगात जी मंदीची लाट होती त्यामुळे अनेक अमेरिकी कंपन्यांचं दिवाळं निघालेलं होतं. डझनांनी बँका बाराच्या भावात गेल्या होत्या. गोल्डमनच्या भवितव्याविषयीही चिंता व्यक्त केली जात होती. फायद्यात मोठी घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण ब्लँकफेन यांची माहिती दिलासा देणारी होती. वाटत होती तितकी काही गोल्डमनची परिस्थिती वाईट नव्हती. ब्लँकफेन सर्व संचालकांना जातीनं फोन करून ही माहिती देत होते. लवकरच कंपनीच्या तिमाही निकालाची अधिकृत घोषणा होणार होती.
दुसऱ्याच दिवशी सकाळी शेअर बाजार सुरू होताच राजरत्नम आणि त्याच्या कंपनीने गोल्डमनचे साडेतीन लाख शेअर्स विकत घेतले. १६ सप्टेंबरला कंपनीतर्फे अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. गोल्डमनच्या भावाने उसळी घेतली. १७ सप्टेंबरला राजरत्नमने आपले समभाग विकले. या व्यवहारात त्याला तब्बल एककोटी ३६ लाख डॉलर्सचा फायदा झाला.
पुढच्या तिमाहीत मात्र चित्र बदललं. यावेळी गोल्डमनची कामगिरी निराशाजनक होती. २३ ऑक्टोबरला कंपनीनं संचालक मंडळाला याची कल्पना दिली. अधिकृत कामगिरी जाहीर झाल्यावर गोल्डमनचे समभाग घसरणार हे उघड होतं. त्या आधीच राजरत्नमने आपल्याकडे असलेले गोल्डमनचे अतिरिक्त समभाग विकून टाकले. प्रत्येक समभागामागे अडीच डॉलर्सचा फायदा राजरत्नमने कमावला.
तसाच प्रकार घडला प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीबाबत. पीअँडजीच्या जैविक उत्पादन विभागाची कामगिरी २००८ सालच्या डिसेंबर महिन्यात फारच निराशाजनक होती. कंपनीनं सगळय़ा संचालकांना तिमाही निकालाच्या आधीच कल्पना देऊन ठेवली. हा निकाल जाहीर झाल्यावर कंपनीचा समभाग गडगडणार हे उघड होतं. तसं व्हायच्या आधीच राजरत्नमने आपल्याकडे पीअँडजीचे एक लाख ८० हजार समभाग विकले आणि वट्ट पावणे सहा लाख डॉलर्सचा घसघशीत फायदा कमावला.
आता यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, हे सगळं कळलं कसं? साधा विषय आहे. राजरत्नम आणि गुप्ता यांच्यातल्या दूरध्वनीचा साद्यंत तपशील सुरक्षा यंत्रणांनी मिळवला. हा दूरध्वनी तपशील आणि राजरत्नम याने नंतर बाजारात केलेले व्यवहार याचं समीकरणच एसईसीच्या गुप्तचौकशी अधिकाऱ्यांनी मांडलं. तेव्हा सगळा मामला उघड झाला.
पुढचा प्रश्न असा की मुदलात एसईसीला गुप्ता यांचा संशय यायचं कारणच काय.तो आला कारण गुप्ता एकेकाळी राजरत्नम याच्या गुंतवणूक सल्लागार कंपनीचे भागीदार होते. त्यानंतर त्यांनी बरंच काही केलं आयुष्यात. खूप मोठे झाले. अगदी अमेरिकी अध्यक्षांनी त्यांच्या मोठेपणाची दखल घ्यावी इतके मोठे झाले.
पण माणूस मोठा आहे म्हणून त्याला सर्व कायदे माफ या भारतीय परंपरेचा वारा अमेरिकी एसईसीला लागलेला नसल्यानं गुप्ता यांची चौकशी झाली. दळभद्री नजरेतनं जगाकडे बघणारे असंही म्हणतील की गुप्ता भारतीय असल्यानं त्यांच्या विरोधात केलेला हा कट आहे.. त्यांचं मोठेपण अमेरिकी कंपन्यांना बघवलं नाही.. वगैरे युक्तिवादही केले जातील, पण ते तसं नाही.
कारण गुप्ता यांच्या विरोधात र्सवकष चौकशी करून गोळीबंद आरोपपत्र तयार करणाऱ्या एसईसीच्या अधिकाऱ्याचं नाव आहे संजय वाधवा. एसईसीच्या न्यूयॉर्क प्रादेशिक कार्यालयात ते चौकशी अधिकारी आहेत.
आज खटला उभा राहिलाय. त्याचा अपेक्षित निकाल लागला तर राजरत्नम याला २० वर्षं तुरुंगवास भोगावा लागेल. गुप्ता यांनाही सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळांवरनं पायउतार व्हावं लागलंय. राजरत्नम यांच्या फायद्यात ते वाटेकरी आहेत, असं सिद्ध झालं तर हा मॅनेजमेंट गुरूही तुरुंगाची हवा खाईल काही र्वष.
असं काही पाहायची-ऐकायची सवय नसलेल्या आपल्या भारतीय मनात हे वाचून सहज प्रतिक्रिया उमटेल. ती अशी असेल-
‘त्यांना कुठली शिक्षा व्हायला.. सगळे सुटतील काही दिवसांनी.. लोकांच्या कुठे लक्षात राहातंय.’
असं वाटणाऱ्या सर्वासाठी पुढची माहिती- एन्रॉनचे सर्वेसर्वा, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांचा उजवा हात गणले जाणारे केनेथ ले यांना अशाच एका छोटय़ा न्यायालयानं एन्रॉन आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी १६५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ही घटना अगदी अलिकडची. २००६ सालची. अमेरिकेचा हा महाउद्योगपती ५ जुलैला तुरुंगातच मरण पावला.
महासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायदा राबवणाऱ्या. नियमापुढे सर्वानाच समान वागवणाऱ्या..



Thanks to Loksatta Link to Original article

Tuesday, April 12, 2011

भारताचा विकास आणि प्रगत देशांची पोटदुखी म्हणजे ते हे !!!


दक्षिण आफ्रिकेतील भारताच्या शिरकावामुळे अमेरिका अस्वस्थ

अमेरिका आणि युरोपीय देशांचे प्रतिनिधी भारत व चीनने मोझंबिक्‍यू व आफ्रिकेतील अन्य देशांत गुंतवणूक करू नये व उद्योग स्थापन करू नये, यासाठी मोझंबिक्‍यूवर दबाव आणत आहेत.

 भारताने मोझंबिक्‍यूमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सेवा, ऊर्जा, खाणकाम इत्यादी क्षेत्रांत शिरकाव आणि गुंतवणूक केल्याने (bharati telecom, reliance, Tata steel etc co's)अमेरिका व युरोपीय देशांना पोटदुखी झाली आहे. तथापि, त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आपण मात्र सहकार्य करीत राहू, असे परखड मत मोझंबिक्‍यूचे परराष्ट्रमंत्री ओल्डेमिरो बलोई यांनी आज येथे व्यक्त केले. 

ज्येष्ठ भारतीय पत्रकारांबरोबर त्यांच्या कार्यालयात झालेल्या वार्तालापादरम्यान ते म्हणाले, की अमेरिका आणि युरोपीय देशांचे प्रतिनिधी भारत व चीनने मोझंबिक्‍यू व आफ्रिकेतील अन्य देशांत गुंतवणूक करू नये व उद्योग स्थापन करू नये, यासाठी मोझंबिक्‍यूवर दबाव आणत आहेत. मात्र, आम्हाला त्याची पर्वा नाही. 

भारत व मोझंबिक्‍यूच्या सहकार्याने व्यूहात्मक पातळी गाठली असून, दोन्ही देशांना वसाहतवादाची पार्श्‍वभूमी आहे. येथे पोर्तुगीजांचे 500 वर्षे राज्य होते व गोव्यात ते 450 वर्षे होते. पाश्‍चात्त्य देश व भारत यांच्यात मूलतः फरक आहे. पाश्‍चात्त्य देशांनी वसाहतवाद केला; तर भारताने मोझंबिक्‍यूच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्हाला पाठिंबा दिला. मोझंबिक्‍यूचे नेते समोरा माशेल भारतमित्र होते. नॅम चळवळीत त्यांनी भारतीय नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. याचा आम्हाला विसर पडलेला नाही, असेही बलोई यांनी सांगितले. दोन्ही देशांत गरिबीचा प्रश्‍न आहे. गरिबी कमी करण्यासाठी मोझंबिक्‍यूची नैसर्गिक संपत्ती भारताला उपयोगी पडू शकते; तसेच तंत्रज्ञान, ऊर्जा, कृषी, विज्ञान व संगणक क्षेत्रातील साहाय्य आमच्यासाठी मोलाचे ठरू शकते. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. भारत व मोझंबिक्‍यूच्या ऐतिहासिक, राजकीय मैत्रीचे रूपांतर आम्हाला सर्वांगीण विकासात करावयाचे आहे, असेही बलोई यांनी सांगितले.

मोझंबिक्‍यूच्या प्रगतीसाठी भारतातील खासगी; तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. राष्ट्रसंघातील सुरक्षा मंडळ सदस्यत्वाच्या भारताच्या दाव्याला बलोई यांनी पाठिंबा दर्शविला; परंतु आफ्रिका खंडातील कोणत्या देशाच्या दाव्याला मोझंबिक्‍यूचा पाठिंबा आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, की याबाबत बरीच मतमतांतरे असून, अजून त्यावर विचारविनिमय होणे आवश्‍यक आहे. दक्षिण आफ्रिका व घाणा हे आफ्रिकेतून या सदस्यत्वाचे दावेदार आहेत. भारतीय उद्योगपतींना मोझंबिक्‍यूचा "व्हिसा' विनाविलंब मिळावा यासाठी मुंबईत कन्स्यूलेट उघडण्याच्या सूचनेवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले