चूकीच्या धोरणातून संस्था जेंव्हा दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभ्या राहील्या तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारने सामान्य नागरिकांचा पैसा त्यांना सावरण्यासाठी वापरला. त्यामुळे खाजगी वित्तीय संस्थांचा तोटा सामान्य करदात्यांच्या पदरात टाकला गेला. यालाच privatisation of profit and socialisation of losses म्हणजेच नफा मात्र खाजगी उद्योजकांचा आणि तोटा मात्र सर्व समाजाचा अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे.
न्युयॉर्कला गेल्यावर टाईम्स स्क्वेअरला भेट देणे हा महत्वाचा क्रार्यक्रम असतो. चोवीस तास येथे जगातील प्रत्येक देशाच्या नागरिकांची वर्दळ असते. दोन चार दिवस रहायचा योग आला तर ब्रॉडवे वरील नाटयगृहात संगीत नाटक पहाता येते. हयातली बरीचशी नाटके १०-१२ वष्रे त्याच नाटयगृहात चाललेली असतात. हयाच टाईम स्क्वेअरचा अविभाज्य भाग होता लेहमन ब्रदर्स १५० वर्षांहूनही अधिक अमेरिकेच्या आíथक प्रगतीची निशाणी अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची गुंतवणूक क्षेत्रात काम करणारी बँक. आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सर्व दोषांचे ती प्रतीक बनली आहे. एखादी कंपनी बंद पडल्याने वा दिवाळखोरीत गेल्याने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येत नाही. अमेरिकेतील एन्रॉनच्या बाबतीतही असे झाले. एन्रॉनला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. एन्रॉनच्या गुहागर मधील प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात वादळ उठले, दाभोळ वीज प्रकल्प बंदही पाडण्यात आला. मात्र एन्रॉन अमेरिकेतील कोसळण्यापाठची कारणे वेगळी होती. लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर अमेरिकन अर्थव्यस्थेमधील मूलभूत दोष लोकांच्या नजरेत आले. अशा दोषांवर उभारलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नव्याने गुंतवणूक करणे अशक्यप्राय होते. योग्य पसा कुणी अयोग्य ठिकाणी गुंतवत नाही. इंग्रजीत हयाला Good money chasing bad money असे म्हणतात. सब प्राईम कर्जे आणि हया कर्जाच्या केलेल्या क्रेडिट डेरिव्हेटिव्ह्ज आपण मागच्या लेखात पाहिल्या. हया अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या अजून दोन कसंल्पना आपण पाहुयात. त्या म्हणजे लिव्हरेज फायनान्स आणि क्रेडिट डिफॉल्ट स्वाप. अमेरिकन अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची दोन मुळ कारणे म्हणजे वित्तीय धोका हाताळण्याची चुकीची पध्दत आणि घरांच्या घसरत गेलेल्या किंमती. लिव्हरेज फायनान्स हे काय प्रकरण आहे? अगदी साध्या उदाहरणातून आपण हे पाहूयात, समजा, तुम्ही १ लाख रूपयांत घर विकत घेतले. त्याची संपूर्ण किंमत तुम्ही साठवलेल्या पशातून किंवा एकही रूपया कर्जाने न घेता दिला हया घराची किंमत वर्षभरात १० हजार रूपयांनी वाढली. हयाचा अर्थ एक लाखाच्या गुंतवणूकीवर वर्षभरात तुंम्हाला १० टक्के फायदा झाला. उत्तम! समजा हेच १ लाख रूपयांचे घर मी माझे स्वतचे १० हजार रूपये भरून आणि उरलेले ९० हजार रूपये बँकेतून ६ टक्के व्याज दराने घेतले तर ९० हजार रूपयांवर वर्षांचे व्याज ५४०० रूपये झाले. वर्षभरात हया घराची किंमत १० हजार रूपयांनी वाढली तर तुम्ही भरलेल्या १० हजार अधिक ५४०० (बँकेचे व्याज) रूपयांवर तुंम्हाला ६५ टक्के फायदा झाला. तुम्ही साठवलेले १ लाख रूपये भरलेत तेंव्हा फायदा १० टक्के झाला. बँकेचे कर्ज घेऊन व्याज भरूनही तुमचा फायदा ६५ टक्के झाला. हयात तुमचे लिव्हरेज होते १०:१. हयाच्याही पलिकडे, हेच घर तुम्ही स्वतकडचे १००० रूपये भरून उरलेले ९९ हजार रूपये बँकेचे कर्ज ६ टक्के व्याजाने घेतले तर तुम्हाला व्याजापोटी ५९४० रूपये भरावे लागतील. हयाच घराची किंमत एका वर्षांत १० हजार रूपयांनी वाढल्यावर तुमचे १० हजार रूपये अधिक ५९४० रूपये बँकेचे व्याज धरूनही तुमचा फायदा १४४ टक्के होतो. हयात तुमचे लिव्हरेज होते १००१. असाच व्यवहार अमेरिकेतील बँका १९९० पासून करीत होत्या. त्यांचे लिव्हरेजचे प्रमाण ३०१ पर्यंत गेले होते. आपल्या कडील बँकांबाबतीत आरबीआय हे प्रमाण 81 पलिकडे जाऊ देत नाही. हया अशा लिव्हरेज प्रमाणात अमेरिकेतील बँका अब्जावधी डॉलर्सच्या उलाढाली करीत होत्या. अमेरिकन सरकारचे पाठबळ असलेल्या प्र्रेडी व फॅनी हया सारख्या गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी तर लिव्हरेजचे प्रमाण १००१ पर्यंत नेले होते. जोवर घरांच्या किंमती दरवर्षी वाढत होत्या तोवर हा मधूचंद्र उत्तम प्रकारे चालला होता. घरांच्या किंमती खाली यायला लागल्यावर मात्र चित्र पालटले. पहिल्या उदाहरणात तुम्ही स्वतचे १ लाख रूपये भरून घर घेतलेत. त्यामुळे त्याची किंमत पुढच्या वर्षी ३० हजार रूपयांनी कमी झाली आणि तरीही तुम्ही घर विकत नाही तोवर हा तोटा फक्त कागदोपत्रीच राहतो. हया उलट, तुम्ही स्वतचे १००० रूपये देऊन बँकेचे ९९००० रूपये कर्जाने घेता आणि दुसऱ्या वर्षी घरांची किंमत जेंव्हा ६०००० रूपये पर्यंत घसरते तेंव्हा घेतलेल्या कर्जासाठी तारण अपूरे पडते. बँक तुंम्हाला तातडीने २९ हजार रूपये भरायला सांगते. मुळात घर घेतांनाही तुमच्या कडे स्वतचे १ हजार रूपये होते त्यामुळे हे २९ हजार रूपये तुमच्याकडे असण्याची शक्यता नाही. घराची किंमत घसरल्याने हया घरावर दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यताही नाही. अखेर बँकेला हे घर परत करण्यावाचून गत्यंतर नाही. अमेरिकेतील लाखो कर्जदारांवर ही पाळी आली. लेहमन ब्रदर्स सारख्या गुंतवणूक क्षेत्रातील बँकांच्या स्टॉक बाबतही असाच प्रकार घडला. लिव्हरेज मुळे नफा जसा कित्येक पटीने वाढू शकतो तसाच तोटाही कित्येक पटीने वाढू शकतो. हे लिव्हरेज लोक नेहीम बँकेकडून कर्ज घेऊन त्या जोरावर स्थावर मालमत्ता विकत घेऊन तसेच क्रेडिट डेरिव्हेटिव्ह्जच्या सहाय्याने करतात. आता अमेरिकेतील आíथक क्षेत्रात जे नवे र्निबध येत आहेत त्यात हया लिव्हरेज प्रमाणावरही नियंत्रण येत आहे. पण त्या आधी त्यांना हे प्रमाण हाताबाहरे गेल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवावे लागतील. हया लिव्हरेज फायना न्स मुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी वित्तीय संस्थांशी क्रेडिट डिफॉल्ट स्वापची निर्मिती केली आहे. हे स्वाप म्हणजे एक प्रकारची विमा योजना आहे. मी १ लाख रूपयांचे कर्ज देतो त्यावेळी तुम्ही वेळच्या वेळी हप्ते भरले नाही तर माझा तोटा होऊ नये म्हणून हे कर्ज मी दुसऱ्या बँकेला विकतो. मला डिफॉल्ट स्वाप विकणाऱ्या बँकेला मी दरमहा फी देतो. यदाकदाचित तुम्ही कर्ज बुडविलेत तर तुम्ही देऊ लागत असलेले व्याज व मुद्दल ही बँक मला देते. समजा तुम्ही १ लाख रूपयांची हेल्थ पॉलिसी घेतलीत आणि त्यासाठी दर वर्षी १० हजार रूपयांचा हप्ता भरायला सुरूवात केली की तुमच्या आजारपणात १ लाख रूपयांपर्यंत पसे देण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते. पण वीमा कंपनी तुमची पॉलिसी मला विकते आणि त्यासाठी तुमच्याच हप्त्यातून दरमहा मला ५००० रूपये द्यायला सुरूवात केली. दुर्दैवाने तुम्ही आजारी पडलात आणि पॉलिसीचे पसे हॉस्पिटल मध्ये भरण्याची वेळ आली तर हे पसे भरण्यासाठी वीमा कंपनी माझ्याकडे बोट दाखवते. मी हे पसे नवे घर घेण्यात गुतवले त्यामुळे हे हॉस्पिटलला देणे शक्य नाही. त्यांत पुन्हा घराच्या किंमतीही खाली घसरलेल्या. त्यामुळे मला दिवाळखोरी जाहिर करण्यावाचून गत्यंतर नाही. अमेरिकेत हाच खेळ जागतिक पातळीवर अब्जावधी डॉलर्सच्या उलाढालीत खेळला गेला. ही क्रेडिट डिफॉल्ट स्वाप्स, रशिया, फोरिया, अर्जेटिना, मेक्सिको अशा देशांना दिलेल्या कर्जाच्या बाबतीतही केली. त्यामुळे प्रत्यक्ष पसे देण्याची वेळ आली त्यामुळे त्यांच्या पुढे पशाच्या उपलब्धतेचे प्रश्न उभे राहीले. लेहमन ब्रदर्स जरी लयाला गेली तरी फ्रेडी व फॅनी तसेच एआयजी मरील लिच सारख्या वित्तीय संस्थांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारला अब्जावधी रूपयांचे कर्ज आणि आíथक पाठबळाची शाश्वती द्यावी लागली. अन्यथा त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोसळली असती. भारतात असे घडले नाही. अमेरिकेत घडलेल्या आíथक उत्पाताचे पडसाद आपल्या आíथक क्षेत्रांवरही उमटले. परंतु कोणत्याही वित्तीय संस्थेला वाचवण्यासाठी भारत सरकारला अíथक मदत देण्याची वेळ आली नाही. आपली अर्थव्यवस्था सबळ असण्याचे हे चिन्ह आहे. १९९० पासून सातत्याने सबप्राईम कर्जाच्या बळावर हया वित्तीय संस्था नफा दाखवत होत्या. तेंव्हा त्यांचा नफा भागधारकांना तसेच व्यवस्थानामध्ये वाटून दिला जात होता. आता त्यांच्या चूकीच्या धोरणातून संस्था जेंव्हा दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभ्या राहील्या तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारने सामान्य नागरिकांचा पैसा त्यांना सावरण्यासाठी वापरला. त्यामुळे खाजगी वित्तीय संस्थांचा तोटा सामान्य करदात्यांच्या पदरात टाकला गेला. यालाच privatisation of profit and socialisation of losses म्हणजेच नफा मात्र खाजगी उद्योजकांचा आणि तोटा मात्र सर्व समाजाचा अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. Link to original article loksatta |
येथेही शेतीतला फायदा शेत कसणाऱ्चा व तोटा समाजाचा असे मानणारे लोक आहेत.
ReplyDelete